पाण्याचं महत्व

on Sunday, September 5, 2010

पाण्याचं महत्व: "

पाणी, सर्व सजीवांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि जीवनकाळात सर्वाधिक वापरला जाणारा घटक. स्वच्छतेपासून आहारापर्यंत आणि शेतीपासून बांधकामापर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी पाण्याची गरज ही अनिवार्य असते. पण आपण रोजच्या जीवनात किती पाणी पितो हेदेखील तितकंच महत्वाचं आहे. एका संस्थेने केलेल्या पाहणीनुसार


 अमेरिकेतील सुमारे पंचाहत्तर टक्के लोक हे गंभीररित्या डिहायड्रेटेड आहेत.


 सुमारे सदतीस टक्के अमेरिकन्स तहान लागली की तिला भूक समजून काहीतरी पदार्थ खातात.


 थोड्या प्रमाणात डिहायड्रेशन झालं तरी आपली चयापचय क्रिया शंभरहून तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.


 झोपताना एक ग्लासभर पाणी पिल्यास मध्यरात्री भूक लागण्याची शक्यता जवळपास शंभर टक्क्यांनी कमी होते.


 पाण्याची कमतरता हे दिवसा थकवा येण्याचे मुख्य कारण आहे.


 दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिल्यास सांधेदुखीचा त्रास ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.


 दिवसभरात इतके पाणी प्यायल्यास आतड्याच्या कॅन्सरची शक्यता पंचेचाळीस टक्क्यांनी, स्तनांच्या कॅन्सरची शक्यता एकोणऐंशी टक्क्यांनी आणि मूत्राशयाच्या कॅन्सरची शक्यता पन्नास टक्क्यांनी कमी होते.

"

0 comments:

Post a Comment