बाप

on Monday, May 3, 2010

काल सहजच माझे ईमेल चेक करत बसलो होतो ... आणि अचानक ... माझ्या मामानी पाठवलेला एक सुंदर ईमेल वाचनात आला ...  "बाप" ... सहज उत्सुकता म्हणून उघडून बघितला आणि पटकन बाबांची आठवन येउन गेली ... हाच ईमेल इथे तुमच्या सोबत शेअर करतो आहे .... तुम्हाला नक्कीच आवडेल :)

---------------------------------------------------------------------------------------------

कॉलेजकटटा

on Saturday, April 10, 2010






कॉलेजकटटा म्हणजे आपल्या सगळ्यांचीच कॉलेज मधली आवडीची जागा ... लेक्चर संपले की निघायच आणि तिथे मित्रांसोबत बसायचं आणि मग गॉसीप तर व्हायलाच हवेत ... परवा माझ्या भावाने एक इमेल पाठवला आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम ताज्या झाल्या ... मग विचार केला की चला आपल्या सगळ्या मित्रांसोबत हा मेल शेअर करूया ….जरा त्यांच्याही आठवणी ताज्या होऊ दे ..

जर तुमच्या ही आठवणी ताज्या झाल्या असतील आणि तुम्हाला एखादा मजेशीर प्रसंग किंवा आठवणीतील गॉसीप शेअर करायचे असेल तर नक्की कळवा ... मला आवडेल वाचायला ... 






पहिला ब्लॉग

on Friday, February 26, 2010

नमस्कार मित्रांनो,

हा माझा मराठी मधला पहिलाच ब्लॉग आहे ... हा ब्लॉग लिहिण्यामागची महत्वाची दोन कारणं आहेत .. पहिल म्हणजे आपले विचार इंग्लिशपेक्षा मराठीमध्ये मांडणे आणि दुसरा म्हणजे इंटरनेटवर मराठीमध्ये असणारं साहित्य किंवा इमेलद्वारे येणाऱ्या वेगवेगळ्या कविता किंवा इतर गोष्टीना तुम्हा सर्वांसोबत शेअर करणे ...

मला माहीत आहेत ... अनेक वेळेस आपण अनेक इंग्रजी शब्द सहजपणे बोलतो किंवा लिहितो ...आणि माझ्या ब्लॉगमध्येही हे नक्की होईल.. इथे माझा उद्देश हा मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा असला तरी अगदी बोली भाषेतली मराठी वापरणार आहे .... साहित्यीक नाही ... जर कोणाला एखाद्या इंग्रजी शब्दासाठी चांगला मराठी शब्द माहित असेल तर जरूर सांगावा ... मी नक्कीच ब्लॉग मध्ये तो वापरीन....

मी आशा करतो तुम्ही माझा ब्लॉग निश्चितपणे वाचाल आणि प्रतिक्रिया कळवाल ...

धन्यवाद